Marathi Department
प्रा. शेवाळे व्ही. एस.
मराठी विभागप्रमुख
संतोष कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स, म्हसरूळ
संतोष कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स, म्हसरूळ च्या मराठी विभागात आपले मनःपूर्वक स्वागत..!
मराठी ही केवळ भाषा नसून ती आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अस्मितेचा आत्मा आहे. आमचा विभाग विद्यार्थ्यांना भाषेच्या अध्ययनासोबतच तिच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंशी जोडण्याचा प्रयत्न करतो.
विभागात पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक अध्यापनपद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील लेखन, समीक्षण, भाषांतर, अभिनय आणि सादरीकरण यांसारख्या विविध कौशल्यांचा विकास केला जातो. विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्याने आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मराठी साहित्यविश्वाशी निगडित ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
आमचे ध्येय आहे — “भाषा, संस्कृती आणि मूल्यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास” विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा, तिच्या सौंदर्याची जाण ठेवावी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी भाषेचा प्रभावी वापर करावा, हीच आमची अपेक्षा आहे. या अद्वितीय भाषिक प्रवासाचा भाग होण्यासाठी मराठी विभाग तुमचे हार्दिक स्वागत करतो..!
Prof. Shewale V.S.
Designation: HOD of Marathi
Qualification: M.A. B.Ed., SET
Specialization:
Language and Literature.
E-Mail Id: vaishnavishewale456@gmail.com
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
(१४ जानेवारी २०२६ ते २८ जानेवारी २०२६)
महाविद्यालयात दिनांक १४ जानेवारी २०२६ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे व तिच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करणे हा होता.
पंधरवड्याची सुरुवात उद्घाटन समारंभ व मराठी भाषा संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. या दरम्यान कविता प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये मराठी साहित्याची समृद्ध परंपरा विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये काव्यवाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादींचा समावेश होता. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व त्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान, आवड व जाणीव निर्माण झाली. हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.





